MARKET
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
ETH/USD $2,488.12 0.82%
SOL/USD $107.45 1.12%
NIFTY 50 21,782.50 0.31%
GOLD $2,024.10 0.15%
DOW 38,677.36 0.13%
S&P 500 5,026.61 0.06%
NASDAQ 15,990.66 0.24%
BTC/USD $47,284.50 2.45%
लिपिक-टंकलेखक पदावरील नियुक्ती राज्यातील रिक्त पदांवर
Published Sep 15, 2026
Author Admin User

लिपिक-टंकलेखक पदावरील नियुक्ती राज्यातील रिक्त पदांवर

लिपिक-टंकलेखक पदावरील नियुक्ती राज्यातील रिक्त पदांवर


पुणे, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून निवड होणाऱ्या ‘लिपिक-टंकलेखक’ संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील या संवर्गातील रिक्त पदांवर करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक १२४/२०२५ नुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, तसेच जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ अन्वये महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेण्यात आली आहे.


या परीक्षेद्वारे ‘लिपिक-टंकलेखक’ पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना केवळ एका विशिष्ट विभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील संबंधित संवर्गाच्या रिक्त पदांवर नियुक्ती मिळू शकणार आहे. त्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारांना राज्यातील विविध ठिकाणी कार्य करण्याची संधी उपलब्ध राहणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाने स्पष्ट केले आहे.


‘लिपिक-टंकलेखक’ पदासाठी परीक्षा देणाऱ्या तसेच निवड होणाऱ्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत करण्यात आले आहे.

0 Comments

Start the conversation!

Be the first to share your thoughts on this story.

Leave a response